• Home  
  • कुंडीत कृषी दिन उत्साहात साजरा; प्रभात फेरी, वृक्षारोपणासह प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
- स्थानिक बातम्या

कुंडीत कृषी दिन उत्साहात साजरा; प्रभात फेरी, वृक्षारोपणासह प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

कुंडी येथे बोर्डीकर कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत कृषी दिनानिमित्त प्रभात फेरी, वृक्षारोपण आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करून आधुनिक शेतीचा संदेश देण्यात आला.

कुंडी येथे RAWE उपक्रमांतर्गत कृषी दिनानिमित्त प्रभात फेरी व वृक्षारोपण

कुंडीत RAWE उपक्रमांतर्गत कृषी दिन उत्साहात; प्रभात फेरी, वृक्षारोपण व शेतकरी सन्मान
कुंडी (ता. सेलू) : बोर्डीकर कृषी महाविद्यालय, सेलू यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कुंडी येथे बुधवारी माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कुंडीत RAWE उपक्रमांतर्गत कृषी दिन उत्साहात; प्रभात फेरी, वृक्षारोपण व शेतकरी सन्मान

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. प्राथमिक शाळा, कुंडी येथील मुख्याध्यापक श्री. राम गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक मा. श्री. जीवन खरात उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गायकवाड सर म्हणाले, “एकाचे हजार दाणे करण्याची क्षमता शेतीत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी. शेतीत काय पिकते यापेक्षा काय विकते याचा विचार करून आपल्या शेतमालाची योग्य जाहिरात व विपणन केल्यास शेतीला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही.”

ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कुंडी गावातून प्रभात फेरी काढून कृषीविषयक घोषणांद्वारे जनजागृती केली. त्यानंतर स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. ए. ए. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एन. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. जी. इंगळे आणि डॉ. एस. वाय. ढाले यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातील प्रगतशील शेतकऱ्यांचा वृक्षरोप देऊन सन्मान केला. “एक शेतकरी, एक झाड, एक संकल्पनेत” असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास कृषीकन्या आईनवार एम. डी., आलटे पी. डी., आलाटे पी. डी., चट्टे एस. एस., बुरी डी., ढेपे ए. बी., तसेच
कृषीदूत भोकरे ए. एन., भुरे व्ही. एस. आणि बिडवे व्ही. पी आणि गंदगे एस जी उपस्थित होते

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

About Us

parbhaniwarta.in ही महाराष्ट्रातील एक डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
परभणी व मराठवाडा परिसरातील ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या
वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Email Us: parbhaniwarta@gmail.com

Contact: +91  91755  94748

PARBHANIWARTA.IN  @2026. All Rights Reserved.   /    Developed by advendesign